STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

विश्वास

विश्वास

1 min
844

दोघांनी केले होते प्रेम खरे,

केला साखरपुडा ही थाटात.

काय सांगु तुला माझी ही व्यथा,

लग्न केले तीने पैसा,नोटा ज्या खिशात.।।१।। 


विश्वास होता प्रेमावर खास.

सारे प्रेम हे खोटे कळले आज.

कुणीही नसतो कुणासाठी.

जो तो जगतो स्वार्थासाठी.।।२।।


केले प्रेम खरे माझ्या मायबापा ने खरे.

संसार सुखाचा करत, गणगोतास आधार.

केले कर्तव्य, पोटाला चिमटा मारुनी.

नोकरी लावली, उभे केले कित्येक संसार.।।३।।


चंदना सारखे झिजले ते खरे.

शिकवले,करावे प्रेम कसे नि:स्वार्थ खरे.

आज कोणी ही जाण ठेवली नाही.

शिकायांचे मला बरेच काही.।।४।।


विश्वासाने साभांळले गणगोत सारे.

येतील का? परतून माझे बाबा.

शिकायाचे बरेच राहुन गेले, 

देइल का?कोणी माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा ....।।५।।


Rate this content
Log in