STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

विज्ञान दिवस

विज्ञान दिवस

1 min
281

राष्ट्रीय विज्ञान दिवस 

आपले भविष्य आपल्या हाती

कठोर मेहनतच यश देतो

भविष्यवाणीवर विश्वास नको

आत्मविश्वासच कामाला येतो

आकाशातील ग्रह अन तारे

चमचमणारे आहेत सितारे

त्यांच्याविषयीची अंधश्रद्धा

विज्ञानाने दूर होती सारे

बुवाबाजी कर्मकांड संपवून

विज्ञानाचा प्रसार करू या

घटनेमागे काही कारण असते

याचे संशोधन करू या

शिक्षणाने मिळवून ज्ञान

असाध्य ते साध्य करता येते

चिंतन मनन अन अभ्यासाने

वैज्ञानिक विचारांची क्रांती होते

विज्ञान सांगतो ह्याच गोष्टी

सर्वाना मिळावी वैज्ञानिक दृष्टी

विज्ञान कळेल जेव्हा सर्वाना

राहणार नाही कुणी दुःखीकष्टी


Rate this content
Log in