विद्यार्थी
विद्यार्थी
1 min
212
असतो ज्ञानपिपासू, जिज्ञासू खरा
तळमळीचा तो ज्ञानार्थी विद्यार्थी |
नसतो केवळ तो मार्कांसाठी
पोपटपंची करणारा परिक्षार्थी | |१| |
आयुष्यभर राहून विद्यार्थी
ज्ञानकण मिळवत तो राही |
स्वत: शिकून समाजासाठी जो
स्वता:स उपयुक्त करू पाही | |२| |
विद्यार्थी असावा डॉ. बाबासाहेब
आंबेडकरासारखा स्वयंप्रकाशी |
ज्याच्या ज्ञानाच्या तेजाने सारे
झेप घेण्या होती प्रेरीत आकाशी | |३| |