विद्याधन
विद्याधन
विद्याधन खास। अजन्म पुरेना
चोरीता येईना।धन ऐसे॥ १॥
कळते रे ज्यास। सुखाचा प्रवास।
जीवना सुवास । विद्याधन ॥ २॥
घेती सानथोर । बुध्दीजीवी प्राणी ।
अस्सलच नाणी। विद्याधन ॥ ३॥
नसे भेदभाव। गरीब श्रीमंत ।
घेणा-या मनात। वसतसे ॥ ४॥
अजन्म विद्यार्थी । मनुष्य हो प्राणी।
नको गर्व मनी । ठेवू नये॥ ५॥
जिवाची माझीया । एकच रे आस।
तयार घेण्यास । विद्याधन ॥ ६॥
मनाच्या घराचे । उघडा हो दार।
जातील विकार । आपोआप ॥ ७॥
विद्याधन खरे। कळले बुध्दास ।
ज्ञानचा प्रवास । अंगीकारी॥ ८॥
विद्येची देवता। सावित्री शोभते ।
नमन करते। तुज माते॥ ९॥
विद्याधन तुज। कळले गे खरे।
ज्ञानदान खरे। केले माई॥१०॥
मिनू म्हणे ऐसे। विद्याधन खरे।
वाटीतच जा रे। विद्याधन ॥ ११॥
