विद्याधन (अष्टाक्षरी)
विद्याधन (अष्टाक्षरी)
1 min
32
आशा अपेक्षा कर्तृत्व
जन्म मरण गाऱ्हाण
दाही दिशा भटकंती
देह धारून हैराण
अदभूत चमत्कार
स्वप्नपूर्ती की हिंदोळा
ज्ञानप्राप्ती चाले शाळा
मोह माया पाश गोळा
विद्याधन अलंकार
पुण्य कर्म व्यवहार
दोष नासे अहंकार
तरबेज कलाकार
नको खोटा हेवा दावा
दानधर्म हेच कर्म
तपोभूमी दिव्यत्वाची
परमार्थ सेवा धर्म
प्रेम जिव्हाळा मौलिक
दिव्य दृष्टी संस्कारांची
मौल्यवान नर देह
जाण ठेवा निरोपाची
