व्हावी आनंदाची
व्हावी आनंदाची
1 min
260
नको होती देवा माझ्या,
देशाची फाळणी,
समतावादी देश माझा,
सर्व धर्मं एक मानी!!१!!
सर्व एक नांदो हिन्दू
शीख इसाई मुसलमानी
प्रेम धागा एक पट ,
व्हावी आनंदाची पेरणी!!२!!
नको धर्माचे भांडण ,
हवी ती प्रेम संजीवनी,
रक्ताचे हे नाते नांदो,
व्हावी आनंदाची पेरणी!!३!!
गर्जो प्रेमाचा पोवाडा,
सदा सर्वत्र त्रिभुवनी,
मना मनातील भेद जावो,
व्हावी आनंदाची पेरणी !!४!!