व्हावे जगणे सहज नी सुंदर
व्हावे जगणे सहज नी सुंदर
1 min
242
स्वप्न साधेसे इवलेसे
वसे माझ्या मनी निरंतर
आपुल्या या वेड्या जगण्याने
व्हावे जगणे सहज नी सुंदर
चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र
रांगोळीत रेखावे सुंदर
बरसता खट्याळ जलदांनी
घ्यावे शिरी नभाचे छप्पर
मनमुराद भिर भिरावे
वाहत्या वायूच्या वारूवर
छेडता तारा जाणिवेच्या
उमटती सुखाचे झंकार
परिमळ गंधित फुलांचा
प्राशावा बनूनी भ्रमर
मधमाशी परी जगावे
ओतूनी मधुघट भारंभार
जपूनी मने सर्वांची
छेडावी जीवनाची सतार
सुंदर फुलवूनी पिसारा
बेधुंद नाचावा मनमोर
