वाटे लाज...
वाटे लाज...
1 min
274
डोळ्यातं अश्रूंची साज
वाटे मला माझी लाज....
तिरस्काराचे ही दंगे
सारं दुःख माझ्या संगे
माझ्यावर दुःखाची गाज....
वादळात माझी नाव
दुर दिसे नात्यांच गाव
दूराव्याचा डोक्यावर ताज....
भावना ही देते धोके
मिळेनात सुखाला मोके
आठवणींना चढला माज....
संगम हा कसला नशा
बघ रे तुच तूझी दशा
चिंता करू नको आज....
