STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

वाट

वाट

1 min
193

शोधता सारीकडे

सापडेना माझी वाट 

चोहूकून तिला 

होती झाडी घनदाट 


होती अशी ती 

वाट वळणाची 

टेकाडे कुठे तर 

होती कुठे लवनाची 


सदा असे झाडाची 

तिच्यावर सावली 

उन्हातान्हात होई 

आमुची ती माऊली 


वृक्षतोड झाली सारी 

वाट माझी करपुन गेली 

चालताना तिच्याऊन आज 

हात पाय भाजुन ही गेली 


नको तोडू वृक्ष 

आहेत ती माऊली 

उन्हातान्हात देतात 

साऱ्यांनाच सावली


साहित्याला गुण द्या
लॉग इन