STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

वात्सल्य

वात्सल्य

1 min
802

आई तूझातली करूणा, वात्सल्य,

शोधून ही मिळणार नाही.

ज्यांने ठेवला तिचा मान,

तेच उंच शिखरावर दिसतात काही.


भांवडांचे रूसने फुगणे,

कधी कठीण त्रासलेले क्षण.

वात्सल्याची पांघरून घालून.

सहज ज़ीवनाचे कोडे सोडून देण.


आई वात्सल्याची मूर्ती,

तिला स्वार्थ भावनांने पुजती.

दोन्ही भावंडांनच्या मध्ये,

तिची वाटणी करून खेळती.


सासरी जाताना लेकरू,

काळीज वात्सल्याचे गेले पिळवटून.

शिकवून,सवरून,करून जपणूक,

रीत दुनियेची म्हणून केली बोळवण.


 मागे वळून, दूर जाताना,

प्रेमे तुझे काळीज तुटताना दिसते.

संसाराच्या मार्गा मार्गावर,

वात्सल्य रूप आठवत,मी पुढे पुढे चालते.


देवाकडे रोज मागणे मागते,

उदंड आयुष्य लाभू दे तिला.

वात्सल्याच्या कुशीत विसावते मन,

तिच्या मायेच्या छायेत, श्वास होतो मोकळा.


Rate this content
Log in