STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वास्तव

वास्तव

1 min
90

काळे ढग नभी आले 

पसरला काळोख धरतीवर 

थवे पाखरांचे सोबतीने 

हिंडे आकाशी चौफेर  


गार वारा सुटला 

विजेच्या सोबतीने 

दिला प्रकाश धरतीला 

निसर्गाची देणगी मानवाला  


 तिच्या कर्ण कर्कश आवाजाने 

 परिसर सारा दुमदुमला 

 घाबरले जीव धरतीचे 

 जीव स्वतः चा वाचविण्याला  


तिच्या आक्राळ रूपाने

भरे धडकी मरणाची  

जीव मुठीत धरून 

पाऊले पडे घराकडची  


कधी वीज भेदीते माणसाला

कधी मुक्या जीवाला 

कधी पडे झाडावर 

कधी भेदीते धरतीला 


जीव धरतीचे घेऊन  

तिचा जीव होई शांत 

दुःख होई धरतीला 

रडे एकटी एकांतात  


सरीवर सरी पाऊसाच्या 

येती दुःख मिटविण्याला 

होई धरती जलमय 

सारा शिवार फुलविण्याला  


खुलला शेतकरी राजा 

लागे पेरणी करण्याला 

आशा त्याच्या जगण्याच्या 

पूर्ण कराया निघाला


Rate this content
Log in