वादळ
वादळ
1 min
379
वादळांची रात आहे
पेटलेली वात आहे
बोलण्याची गोड भाषा
काळजाला वात आहे
पेटला एकांत माझा
जाळली मी रात आहे
चांदण्याची रात्र मोठी
सोडला तू हात आहे
पावसाचे गीत साकी
वाळवंटे गात आहे
खेळ तू जिंकून गेली
डाव तो वादात आहे
हारणे मंजूर नाही
झुंजणे युद्धात आहे
चंद्रमाला जिंकले मी
माणसाची जात आहे
