STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

वादळ-गीत-संजय र. सोनवणे

वादळ-गीत-संजय र. सोनवणे

1 min
219

आले हो वादळ संघर्षाचे आले 

तीन जूनला त्यांचे स्मरण झाले 

बीड जिल्ह्याचे,महाराष्ट्र मातीचे 

भगवान गडाचे,गोपिनाथ गडाचे 

शेतकरी,कामगार, श्रमिकांचे 

भारत देशाचे,नाथ्रा गावाचे 

आले हो वादळ संघर्षाचे आले 


तुफान विचारांचे,वादळ आले 

गरीबांचे विचार ऐकण्यास आले 

बहुजन वर्गास ते प्रेरणा ठरले 

प्रेमाने त्यांनी मित्र जोडले 

ऋणानुबंध अखंड त्यांनी ठेवले 

आले हो वादळ संघर्षाचे आले 


आवाज गरीबांचा घोंगावत आले 

न्याय त्यांस मिळवून देण्यास आले 

अत्याचाराचा,बिमोड करण्यास आले 

जनसामान्यास न्याय देण्यास आले 

शोषितांचे आधार होण्यास आले 

आले हो वादळ संघर्षाचे आले 


सामान्य कार्यकर्त्यास उठविण्यास आले 

त्याचे भले करण्यास जागवू लागले 

नाथ गरीबांचे होण्यास आले 

वेदना त्यांच्या समजण्यास आले 

पाठीवरची ते थाप देण्यास आले 

आले हो वादळ संघर्षाचे आले 


अदृष्य वादळ क्रांतीचे आले 

समाजजागृतीचे प्रेरक आले 

समाज एकत्रित व्हा सांगण्यास आले 

आपसातील वैर मिटविण्यास आले 

संघटनेची शक्ती देण्यास आले 

आले हो वादळ संघर्षाचे आले 


एकत्रित येण्यास सांगू लागले 

समाजाचा इतिहास सांगू लागले 

प्रेरणा कष्टाची देण्यास आले 

दु:खाची जाणीव सांगण्यास आले 

प्रबोधन करण्यास विनवू लागले  

आले हो वादळ संघर्षाचे आले 


गोपिनाथ मुंडे साहेब वादळ ठरले 

लढे संघर्षाचे निकराने लढले 

स्वाभिमान ते शिकवून गेले 

गर्व,अहंकार कधी ना दिसले 

चालत रहा गड्या सांगत राहीले 

आले हो वादळ संघर्षाचे आले.


Rate this content
Log in