उत्तर अजून मिळाले नाही
उत्तर अजून मिळाले नाही
समाजात अजूनही का दिसत आहेत
विकृत भावनांचे भयानक चेहरे
नाही का ह्रदय त्यांच्या ठायी
जे चिरडतात पायदळी स्त्रीशीलाला
मी मलाच कितीदा प्रश्न विचारते पण
उत्तर अजून मिळाले नाही!
जग मंगळावर जाऊन पोहोचले तरी
कोंबड्या,बोकडांचे पडतात बळी
हद्द तर तेव्हा होते यांच्या बालिशपणाची
जेव्हा नरबळीने गुप्तधनाची लालसा पूर्ण होते
सांगा प्रश्न हे तुम्हालाही पडतात का?
पण उत्तर अजून मिळाले नाही!
जग विज्ञानाच्या जोरावर प्रगती साधत आहे
जातीपातीचे राजकारण आमची प्रगती खुंटवत आहे
ऊठ माणसा आता तरी जागा हो
तुझ्या प्रगतीत तुच मोठा अडथळा होतो आहे
बदलेल ही परिस्थिती वाटते कधीनाकधी
पण उत्तर अजून मिळाले नाही!
सैन्यात होऊन भरती करावी देशसेवा
तरुणपिढीने जेरीस आणावे देशाच्या शत्रूला
पण काय झाले आहे या तरुणपिढीला
मोजके सोडून बाकीचे चिकटले आहेत मोबाईलला
कधी कळेल यांना उज्ज्वल भविष्य आपले
उत्तर अजून मिळाले नाही!
