उन्हाळा
उन्हाळा
1 min
195
चढत चालल्या ऊन सावल्या
उगीच सलतोय पारा
गर्द झाले आभाळ सारे
आवंढा गिळतोय वारा...
वावटळाला उधाण आलंय
पालापाचोळा उडतोय सारा
उनाड झाले शिवार सारे
हिरवळीला ही नाही थारा...
ओथंबली ती काया
बरसतात घामाच्या धारा
व्याकुळती अन् कातल
कासावीस होते धरा...
ऊन सावलीचा खेळ सारा
मृगजळाचा भास अभास खरा
जुळे सूर्याचा अन् चंद्राचा
क्षितिजावर किनारा...
