STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

उंच भरारी

उंच भरारी

1 min
193

विशाल खुल्या आभाळी 

तुझी ही उंच भरारी 

मनगटी ठेव बळ 

बाणा असुदे करारी ||१|| 


जिद्दीच्या या सामर्थ्याने 

आकाश तू हे व्यापशी 

तुझ्याच हाती असती 

स्वप्ने बाळग उराशी ||२|| 


पादाक्रांत तू करशी 

साऱ्या जगाची शिखरे 

उजळूनी रूप तुझे 

सर्वस्व सारे निखरे ||३|| 


तुझ्या या यशस्वीतेचे 

कष्ट येवो जगापुढे 

तुमच्या या कर्तुत्वाने  

आनंद हो चोहीकडे ||४|| 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை