STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

तू

तू

1 min
424

मानवतेची जन्मदात्री तू 

सहनशीलतेची मूर्ती तू 


मायेची अभिलाषा तू 

सौंदर्याची परिभाषा तू 


निरागसतेचा स्पर्श तू 

आनंदाचा हर्ष तू 


आयुष्याचे सार तू 

मनामनातील विचार तू 


अन्याय विरुद्ध वार तू

शोषितांचा आधार तू 


कधी ताई ,कधी आई तू

कधी पत्नी, कधी मैत्रीण तू


जगण्याचा विश्वास तू 

अन् अखेरचा श्वास तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन