तू बदलू नकोस..!
तू बदलू नकोस..!
1 min
449
दिवस बदलले तरी
खुशाल बदलू दे...
महिने बदलले तरी
खुशाल बदलू दे...
वर्ष बदलले तरी
खुशाल बदलू दे...
ऋतू बदलले तरी
खुशाल बदलू दे...
पण तू बदलू नकोस...
क्षणांच्या आठवणींना
उगाच तू छळू नकोस...
सरत्या वर्षातील स्वप्नांना
अपुरे तू सोडू नकोस...
माझ्या अपुऱ्या इच्छांना
तू वांझ करू नकोस...
हे नव्या वर्षा...
जुन्या वर्षातील माझ्या लोकांना
माझ्यापासून तू दूर करु नकोस...!
