STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

तू आईला विसरला....

तू आईला विसरला....

1 min
385

परगावात तू आईला विसरला 

सांग तुझा जीव का नाही गहीवरला....


अश्रूंचे मी एकटी वेचते काटे 

आई वाचून होतात का तुझे तोटे 

असा कसा तू रे एकटाच सावरला.....


मनात माझ्या बाळा तुझा वास

मायेविना तू करे पैशाची आस

तुझ्या आईने रे राग आहे आवरला....


तुझ्या आठवणींत घासात खडा 

आईचा रे तुझ्यासाठी जीव वेडा 

येशील का घरी माझा जीव घाबरला....


संगम बस झाल तुझ लातूर 

आईचा जीव तुझ्यासाठी आतुर 

माझा लाल तू माझ्या पोटी अवतरला.....


Rate this content
Log in