तुझ्याविना जीवन
तुझ्याविना जीवन
सोबत जगलो दोघं
मरण नाही चुकले कुणाला
पण तुझ्याविना जीवन
नाही कल्पवत रे मनाला
स्वभाव माझा चिडका
दोष देऊ कुणाला
हसत पित राहीलास तू
अपमानाचा प्याला
नाही समजु शकले,मी
निर्मळ तुझ्या मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत रे मला
तू नेहमी साथ दिलीस
स्वप्नं माझी रंगवायला
हात कमी पडले माझे
दूःख तुझं सावरायला
तू नेहमी घेतलंस ओंजळीत
खचलेल्या माझ्या मनाला
आज तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत रे मला
तू पहात होतास नेहमी
उगवत्या प्रसन्न सूर्याला
मी न्याहाळाची मनी
मावळत्या त्या चंद्राला
तुला कधी उदास पाहुन
यातना होतात रे मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत रे मला
विसर राजा तू आता
कडव्या त्या क्षणाला
तू नेहमी दिलेस बळ
माझ्या या जगण्याला
तुझ्यानंतर कोण सावरेल
हळव्या माझ्या मनाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत रे मला
नियतीचे ते विधान
नाही चुकले रे कुणाला
तुझ्याविना काहीच अर्थ
नसेल माझ्या असण्याला
माझ्यातलं थोड आयुष्य
लाभू दे रे तुला
तुझ्याआधी ने मला
हेच मागणं त्या देवाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत रे मनाला
नाही कल्पवत रे मनाला
