STORYMIRROR

Rahul Shedge

Others

4  

Rahul Shedge

Others

तुझ्याशिवाय विश्व नाही

तुझ्याशिवाय विश्व नाही

1 min
375

तुझ्याशिवाय कोणी जगात येणार नाही

तुझ्या कुशीतुन सारे घेई गगनभरारी ॥धृ॥  


 माँ जिजाऊ, सावित्रीच्या असे हो लेकी  

प्रेरणा घेऊनी त्यांची सार्‍या झाल्या ज्ञानी 

स्वयंपुर्ण तु कर्तृत्त्वानं नारी 

सार्‍या विश्वाला तुच गं घडवी ॥१॥


तु असे गं सार्‍या जगाची माऊली

तुझ्यामुळे मिळे सार्‍यांना सावली  

संसार तु हिम्मतीनं फुलवी 

तुझ्यामुळे सारेजण होई गं सुखी ॥२॥


संघर्षातुनी तु शिक्षित गं झाली 

खांदयाला-खांदा लावुन तु असे उभी 

निडरपणे तु दुनियेशी लढली

अन्यायासमोर तु खंबीर हो गं उभी ॥३॥


लहान झर्‍याची तु प्रवाही नदी 

तुझ्यामुळे येई संसारात समृध्दी 

तु असे गं लक्ष्मी घरची

तुझ्यामुळे सारे घर गं भरी ॥४॥


उत्तुंग झेप घे तु आकाशी 

सार्‍या विश्वाची तु गं परी 

नवे नाते तु आपुलकीने जपणारी  

हर एक क्षेत्रात तूच गं चमकली ॥५॥  


Rate this content
Log in