तुझ्या गावावरून जाताना...
तुझ्या गावावरून जाताना...
1 min
4.4K
तुझ्या गावावरून जाताना...
तुझ्या गावावरून जाताना
तरळल्या जुन्या आठवणी
सतत उभी डोळ्यासमोर
भास होत होता मनोमनी.
तुझ्या गावावरून जाताना
आठवल्या जुन्या स्मृती
जावून आलो त्या ठिकाणी
जेथे फुलली होती प्रीती.
तुझ्या गावावरून जाताना
एकच होता मनी ध्यास
भेटावे त्या प्रत्येकाला
जे होते आपले खास.
तुझ्या गावावरून जाताना
भरून आले माझे मन
आठवूनी ते दिस वाटे
जगावे पुन्हा जुने क्षण.
तुझ्या गावावरून जाताना
वाटे तु ही सोबत यावी
तुझी दुःखे मला द्यावी
माझी सुखे तुझी व्हावी.
