तुझ्या दर्शनाला
तुझ्या दर्शनाला
1 min
249
तुझ्या दर्शनाला येतो
भक्तिभाव घेवून
पण बाप्पा तुझे कार्यकर्ते
जाती भाव खाऊन
तासनतास मी लाईनीत उभा
जीव जातो कातावून
धनदांडग्यांना ते सोडती
का मागल्या दारातून
चढाव्याचा देवा तुला
सोस मुळीच नाही
पण कार्यकर्त्यांच्या वागण्याला
कुठे पायपोस नाही
ही जीवघेणी रेटारेटी
मी करू कशापायी
भरून आहेस तू देवा
सृष्टीत ठाई ठाई
उत्सव झाले गल्लाभरु
तुम्ही विचार साधा करा
भुलू नका हो गर्दीला
तुम्ही मनी पूजन करा
