STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

4  

sarika k Aiwale

Others

तुज विन कोण सख्या

तुज विन कोण सख्या

1 min
191

मिटल्या पापणीतली

एक आस जपलेली

येशील माघारी तुही

आकांक्षा ती संपलेली


तुज विन सख्या कोण 

 प्रश्न मनी कोलाहल

 अखेरीस समजली 

होती मनात जी सल


तुज विन कोण सख्या 

नको हा सवाल पुन्हा 

नाहीच ती वाट माझी 

नको तो प्रवास पुन्हा


निर्जिव या पापणीत 

नको जीवन दाटाया 

नको अश्वासक बोल

नवस्वप्न रेखाटाया


तुझ विन नसे कोणी 

सखा मज या जीवनी

जगवले जरी तु मला

श्वासाना आस देउनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन