तुच कर्ता करविता..
तुच कर्ता करविता..
1 min
159
भाव भोळ्या भक्तीची
आस जिव्हारी लागता
हाक देई काळजाची
तुच कर्ता करविता
देह झिजला कष्टाने
मन दु:खात हारता
एक नाम तूझे ओठी
नको ती सचोटी आता
येई उमाळा ना तुज
मनी झरा ओझरता
उषा संचिताची हासे
आशा ह्रदयी वसता
राहो चित्ती नाम सदा
तुच कर्ता करविता
भेगा जीवना पिडता
तूच औषध हो आता
वार घोर निराशाचा
घाव काळाचा झेलता
दोष नसे तो कुणाचा
तुच कर्ता करविता
देवा तुझ्या गाभार्यात
भाव भक्तिला मुकला
तुच कर्ता करविता
मर्म मजही कळला
