ठोका काळजाचा
ठोका काळजाचा
1 min
11.4K
ठोका काळजाचा रोजच चूकतो
जेव्हा रूग्णालयातील व वर्दीतील देवदूतांना पाहतो
स्वत:चा जीव धोक्यात रोजच हे घालतात
समाजाच्या रक्षणासाठी स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहतात
बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी मुले,
वाट पाहतच झोपतात.
इवली- इवली चिमणी बाळं आईसाठी रडतात
आपण घरात सुरक्षित राहण्यासाठी हे धडपडतात