STORYMIRROR

UMA PATIL

Others

1  

UMA PATIL

Others

तो आणि हा पाऊस

तो आणि हा पाऊस

1 min
271

बस ! सागराची गाज... तो आणि हा पाऊस

बेभान झाला आज... तो आणि हा पाऊस


करतील माझे अंग, रिमझिम सरींनी चिंब

गंधीत आहे साज.... तो आणि हा पाऊस


माझ्या मनी काहूर... भेटायला आतूर 

का आणती मज लाज... तो आणि हा पाऊस


बहुधा असावा बेत... त्यांचा निराळा आज

देतात मज आवाज... तो आणि हा पाऊस


ना सांगती ते गूढ... त्यांचे कधी कोणास

हृदयात दडवी राज... तो आणि हा पाऊस


Rate this content
Log in