तिरंगा माझी शान
तिरंगा माझी शान
1 min
329
तिरंगा आहे माझी शान
भारत देश माझा महान
करतो आम्ही त्याला वंदन
आहेे त्याला खूप मान
आपला राष्ट्रध्वज तिरंगा
भारताचा मानबिंदू ठरला
भगवा पांढरा हिरवा रंग
निळे अशोक चक्र तिरंगा बनला
केसरी त्यागाचे प्रतीक
पांढऱ्या मध्ये आहे शांतता
हिरव्यात असे समृद्धी
निळे अशोक चक्र सागराची अथांगता
15 ऑगस्ट या सुंदर दिनी तिरंगा
सन्मानपूर्वक फडकतो भारतात
फुले आणि पाकळ्या ठेवूनी
फडकवतात तिरंगा भारत देशात
देशभक्ती गीत गाऊनी सारे
आनंद साजरा करी समाज
जन,गण,मन राष्ट्रगीत गाऊनी
दिसे मनी एकटेपणा रोज
