STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

4  

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

तिळगूळ

तिळगूळ

1 min
491

तिळाचा दाणा साखरेला म्हणाला

तुझ्याशिवाय नाही गोडवा मला

साखर म्हणाली तूच भावला

तुझ्याशी सलगी आवडेल मला

तिळाचा दाणा खूपच लाजला

साखरेला पाहून कोपऱ्यात बसला

साखरेला मग रागच आला

तिळाला म्हणाली कुठे शोधू तुला

तिळाचा दाणा पुढे आला

साखरेला तो अलगद बिलगला

साखरेचा स्पर्श चिकट झाला

तिळाला म्हणाली नाही सोडणार तुला

तिळाचा दाणा असा काही फुगला

साखरेसोबतच नांदू लागला

संक्रातीचा सण आला

तिळगूळ एकत्र फिरू लागला

हातात हात देवू लागला

प्रेमाचा संदेश चौफेर पसरला.


Rate this content
Log in