STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

तीन दांडू एक चेंडू

तीन दांडू एक चेंडू

1 min
659

क्रिकेट म्हणजे एक

वेड्यांचा खेळ आहे

त्याच्यासाठी प्रत्येकाकडे

वेळच वेळ आहे


सोडून हातातली कामे

नोकरीला दांड्या मारतात

विराट किती खेळणार म्हणून

पैजेवर पैजा मारतात


धोनी द्रविड सेहवाग

यांचे आहेत देव

सचिन म्हणजे सगळ्यांच्या

हृदयातली ठेव


भारत पाकिस्तानची मॅच

प्रसंग युद्धाचा होतो

सगळेच एक होतात

देश योद्ध्याचा होतो


तीन दांडू एक चेंडू

आणि प्लेयर बारा

गल्लोगल्ली खेडोपाडी

वाहतो क्रिकेटचा वारा


वर्ल्ड कप येताच

लागते साऱ्यांना ओढ

साहेबांच्या या खेळाने

जगास लावलय वेड


साहित्याला गुण द्या
लॉग इन