STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

5.0  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

ती सावित्री

ती सावित्री

1 min
27.2K


एक ती सावित्री पौराणिक काळातली

तिनं वडाला फे-या मारायला शिकवल्या

आणि एक ती फुलेंची सावित्री आधुनिक काळातील जीनं अज्ञानातून बाहेर पडायला शिकवलं....


ती सावित्री फक्त चुली आणि मूलच

फक्त करत असायची

आजची ही सावित्री चुलमूल सांभाळुन

नौकरीही करायची....

एक ती सावित्री अन्याय सहन करणारी

एक ही सावित्री अन्यायविरूद्ध पेटणारी...


एक ती सावित्री श्रद्धेस बळी पडून

अंधश्रद्धा जपणारी

एक ही सावित्री विज्ञानाची कास धरून

अवकाशात उड्डाण घेणारी

एक ती सावित्री सत्यवानास परत आणणारी

एक ही सावित्री शिकून स्वावलंबी जीवन जगणारी.......


एक ती सावित्री वडाला दोरा बांधून हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून प्रार्थना करणारी

एक ही सावित्री वडाचे वृक्षारोपण करून

वृक्षसंवर्धन करणारी....

एक ती सावित्री पुजापाठ,व्रतवैकल्ये करणारी

एक ही सावित्री(सिंधुताई सपकाळ)अनांथाची माय होऊन माया देणारी...


Rate this content
Log in