ती.....अष्टभुजा
ती.....अष्टभुजा
अष्टभुजा मिरवीत निघाली
आई भवानी वाघा वरती स्वार
तूच दुर्गा तूच काली बनूनी
करीत आली असुरांचा संहार
जगत जननी आदिमाया
वाहते जगताचा भार
महिषासुरमर्दिनी परतुनी
लाविले असुरांचे भार
तुझीच रूपे माय माऊली
लखलखली या विश्वात
कधी माया कधी आदिमाया
जाहली प्रज्ञावान प्रख्यात
रंगरूपाच्याही पार झळकली
तेजोमयी ती सूर्या समान
कधी चंद्राची शीतलता लेऊनी
कधी प्रखर किरणे तेजायमान
लखलख चंदेरी अस्तित्व
जपले प्रत्येक स्वरुपात
घरादाराची होऊनी ढाल
आदरणीय सदा मन मंदिरात
अन्यायाविरूद्ध रोष,धग नयनात
पेटविली धगधगती ज्वाला
नराधम आणि दुष्कृत्यांना
सांगे वेळीच आळा घाला
