तिच्या भावविश्वात
तिच्या भावविश्वात
1 min
339
तिच्या छोट्याशा भावविश्वात
ती नेहमीच मशगुल दिसते..
तिच्या राऊळातील देवासाठी
ती गंधाळणारं फुल असते..!!
काटयांनी घेरलेले विश्व तिचे
ती त्यातूनही सहज बहरते..
उन्ह, वारा, पाऊस सोसत
ती सदाफुलीचं रूप धरते..!!
कितीदा खुडली,अकाली विझली
ती समईतली वात निरंतर बनते..
जगाचा अंधार शोषून अंतरात
ती प्रकाश चिरंतर जगास देते..!!
अनंत घाव सोसते उरात
ती वेदनेशी नाते निभावते..
साऱ्या विश्वाचीचं पालनहार
ती धरा हिरवी सर्वांस पोसते..!!
पण प्रश्न हाच मागे उरतो
ती तरीही का उपेक्षित राहते..?
बदलावयास हवे तिने स्वतःसही
ती जगास साऱ्या बदलू शकते..!!
