STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

थोडं थांब... जरा आता

थोडं थांब... जरा आता

1 min
301

खूप खस्ता खाल्ल्या, हालही खूप झाले

सुखाचे किरण दिसत नव्हते म्हणून म्हटले

आयुष्याला थोडं थांब......जरा आता


खूप वाद झाले, खूप ओझे वाहिले

आता सुखाचे कण वेचुया थोडे म्हणून म्हटले

आयुष्याला थोडं थांब........जरा आता


दयामाया खूप केली, नातीगोती जपली

आता थोडे स्वाभिमानाने जगूया थोडे म्हणून म्हटले

आयुष्याला थोडं थांब....जरा आता


खूप हिंडले दारोदार सुखाचे क्षण मिळवाया

आता थोडे आनंदाने जगू या म्हणून म्हटले

आयुष्याला थोडं थांब... जरा आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन