STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Others

3  

Deepali Thete-Rao

Others

ते वयच वेड असतं

ते वयच वेड असतं

1 min
11.8K

ते वयच वेड असतं

कुणी मोहवूनी जातं

मन स्वप्नात तरंगत रहातं

मुग्ध गंधात गंधूनी जातं

ते वयच वेड असत......


का जाणे कशासाठी

मन सैरभैर धावतं

सगळ मागे सोडून 

मला कुणाकडे खेचतं

ते वयच वेड असत......


कुणी म्हणा प्रेम बावरी

भान जगाच नसतं

कळत असत सारं तरीही

वळत काहीच नसतं

ते वयच वेड असत......


कुठल्या प्रेमाच्या अवकाशात

मन पाखरू भिरभिरतं

ना मिळे ते हसू चोरटे

उगाच हताश हळहळतं

ते वयच वेड असत......


अचानक गहीवरतं मन

कुणी हळूच मला खुणावतं

डोळ्यातील त्या जादुने

हे अंग मोरपीस बनतं

ते वयच वेड असत......


तव ह्रदय मला देताना

एक नव नात खुलतं

मला छोटासा कोपरा हवा म्हणताना

सारं आभाळच मिठीत येतं

ते वयच वेड असत......


सगळ्या जाणीवा बधीर होतात

त्या एका शब्दासाठी कान आतुरतात

प्रेमात पडल्यावर जाणवत

ते हुरहुरणं खर तर याचसाठी असतं

ते वयच वेड असत......

ते वयच वेड असत......


Rate this content
Log in