STORYMIRROR

Suchita Kulkarni

Children Stories

2  

Suchita Kulkarni

Children Stories

तान्हुला बाळ

तान्हुला बाळ

1 min
429


तान्हुला बाळ


चल चल बाळा

नेते तुला दूर

करू नको खोड्या

देऊ तुला मार?


जंगल झाडीत

विसर पडेल

मग रडशील

अंधार होईल


अजून छोटासा

तान्हुला तू बाळ

सोनूला तू सान

स्वतः स सांभाळ


घेऊन मी येते

तुज चारा पाणी

रडू नको आता

नको डोळा पाणी


पाण्यात डुंबणे

खेळ आवडीचा

दाखवेन मीच

कसा खेळायचा


आई माझी आई

सर्वांहून गोड

किती ग प्रेमळ

नाही तुला तोड


किती जपतेस

तुझ्या या बाळाला

भाग्यवान मीच

जीव आनंदला



साहित्याला गुण द्या
लॉग इन