स्वसिद्धतेची परीक्षा....इच्छा
स्वसिद्धतेची परीक्षा....इच्छा
1 min
245
स्वतःला सिद्ध करण्याची
परीक्षा जीवघेणी फार
अंत पाहणारे निष्ठुर क्षण
निरंतर खेळवत राहणारे
ओझं नसेल वाटत तरीही
तणावाची जाणीव सततची
विसावणारा खडतर प्रवास
एकांत कधी न मिटवणारा
अंधारातूनी निश्चयी वाटचाल
पूर्णत्वाची परिकल्पना
दूरदृष्टीला व्यापक दृष्टिकोनाची
उस्फूर्त साथ अशी
स्वसिद्धतेची स्वप्नपरी इच्छा
एकदातरी व्हावी पूर्ण
रंगवलेले स्वप्न हे असे
राहावे पुढयात उभे