STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

स्वप्नवेडे

स्वप्नवेडे

1 min
11.4K

स्वप्नवेडे ते अथांग सागर,

स्वप्न उठती लहरी गगन भेटीस.

नादब्रम्ह वाजत ध्यास काहूर,

आतुर होत तो ही भेटीगाठीस.


गरूडझेप घेती वादळे अनेक,

न डगमगता जावे समोर नेक.

पंख घेऊन सकारात्मक विचारांचे,

चक्रव्यूह छेदे, बळ आत्मविश्वासांचे.


अंतरी रंगवी सदा स्वप्न वेडे,

उजळून चंदनापरी ते परिमळत.

डोळ्याच्या पापणी साकार तिजोरीत,

संसार गाडा हाकता, ठेवा स्मृतीत.


वादळात अडखळे पाय कार्यपूर्तीत,

स्मरा, चायवाला प्रधानमंत्री होत.

ढासळलेल्या पंखात पुन्हा बळ येत,

आयुष्य जीवन भरभरून बहरत


Rate this content
Log in