स्वप्नझेप
स्वप्नझेप
1 min
11.6K
स्वप्नझेप माझी
अफाट आहे उंच
बांधा आहे माझा
कमनीय टंच.....
स्वप्नझेप ही मला
जगावीशी वाटते
नयनात मी स्वप्न
साठवू पाहते.....
भेटणार स्वप्नातला
राजकुमार हसरा
असेल तो उमदा
अन लाजरा बुजरा.....
येणार्या या क्षणाला
सामोरी मी जाईन
स्वप्नझेपीची दुनिया
सत्यात मी जगेन....
माझ्या गोबर्या गाली
हसेल छान खळी
घेईल मला तो कवेत
स्वप्नजगात आभाळी....
स्वप्नांच्या *झोक्यावर*
होते मी आरूढ
सांगत नाही हो
मी हे भारूड....