अर्धचंद्र
अर्धचंद्र

1 min

123
*अर्धचंद्र*
नभीचा गोल चंद्रमा
दिसतो पुनवेला
चंद्रकला नव - नव्या
प्रत्येक दिवसाला....
कधी चंद्राची कोर
येते माझ्या अंगणी
कधी येतो अर्धचंद्र
दिसतो या नभांगणी....
चम चम चांदण्या
गगनी चमकतात
चंद्र आणि चांदण्या
एकत्र नभी खेळतात...
चला जावू मित्रहो
त्यांच्या संगे खेळायला
उंच उंच उंच ढगात
लपाछपीत रमायला....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा - पुणे*