स्वप्नबंध
स्वप्नबंध
1 min
15
अशीच यावी वेळ कधीतरी
स्वप्न बंधनात मी अडकावे
जवळी मज घेऊन सख्या तू
प्रेमा वर्षावात मला भिजवावे....
असावा एकांत आजूबाजूला
शांत वेळ आपल्याला मिळावी
सदाचीच घाई तुझी असते
माझी चांदणं रात तू सजवावी...
होता लाजून चूर चूर मी सख्या
संकोचाचा अंमल राहतो या मनावर
तनू देखील थरथर कापते माझी
लज्जेची दाट छाया येते मुखावर...
बोलावे वाटते सख्या काहीतरी
ओठ ओठांनी बंद केलेस साजणा
एकांताच्या या मिलन क्षणाला
हळुवार मला बाहू पाशात घे ना...