सेल्फी
सेल्फी
1 min
8
सेल्फी हवीच बाई जीवनात
वेळ जातो परत तेच बघण्यात...
सेल्फी घ्यावा सांभाळून बर
त्यातही आहेत धोके बरका खरं...
आपला सेल्फी आपल्याला आवडतो
जीवनातील गतकाळ खुलवतो...
सुखावतो आपण परत ते पाहून
रमतो त्यातच पुन्हा राहून राहून....
चेहऱ्याचा मुखडा पाहण्यात दंग
उजळवतील चेहऱ्यावरचे रंग.....
जसा चेहरा तसे मनाचे सेल्फी बघावे
या सेल्फी मध्ये स्वतःला न्याहाळावे....
आपला चांगला गुण तपासावा
वाईट गुणांचा नायनाट करावा....
सामाजिक बांधिलकी जपावी
वृक्षांची जोपासना करावी....
तन,मनाचे सेल्फी घेऊ छान
तरच मिळेल आपल्याला समाजात मान...