STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

3  

Suvarna Patukale

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
239

घ्यावी सागराची खोली

द्यावी हृदयातील माया ओली

हेच छोटसं स्वप्नं माझं.....


घ्यावा परिपूर्ण ज्ञान प्रकाश

अणि पंखांवर पेलावं आकाश

हेच छोटसं स्वप्नं माझं........


घ्यावा वाऱ्याकडून वेग

जिंकावा मनाचा आवेग

हेच छोटसं स्वप्नं माझं.......

घ्यावी वृक्षाची नम्रता

लिहावी समर्पणाची कथा

हेच छोटसं स्वप्नं माझ........


घ्यावी सृष्टीची भव्यता

वहावी सूर्याची दिव्यता

हेच छोटसं स्वप्नं माझ........


घ्यावा रेशमी प्रीतीचा बंध

वेचावा जीवनातील गंध

हेच छोटसं स्वप्नं माझ........


साहित्याला गुण द्या
लॉग इन