STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन

1 min
23.2K

देश प्रेमच माझे नाते,अन तेच धर्म,

वाहू दे प्रत्येक नसा नसात देशभक्तीचे रक्त.

जपून ठेवू, क्रांतिकारांचे वेडे समर्पण,

तेवत ठेवू प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वातंत्र्य दिनाची ज्योत.


संसाराचा विचार न करता,

कित्येकाने अर्पिले आपले जीवन.

केला जीवनाशी संघर्ष,

त्यांच्या बलिदानाने प्रतिक हे स्वातंत्र्य दिन.


करतो सदैव आम्ही प्रणाम,

देशाच्या रक्षणा लढले वीर जवान.

केले वेडे समर्पण,बलाढ्य, सुंदर,

स्वतंत्र, करण्या भारत देश महान.


प्रत्येक नागरिकांने राखावा देशाचा मान.

उच्च नीच भेदभाव विसरून.

रक्ताच्या थेंबा थेंबातून निघू दे देशाचेच गुणगान.

राखू ,देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वाभिमान.


देशाच्या प्रगती उभे राहू, हातात हात घेऊन.

माणूसकीचा हात एकमेकांना देऊन.

खोटे धर्म, जात,मान,सन्मान विसरून.

थोडे वेडे समर्पण, आपण ही पाहू करून.


भष्ष्ट्राचाऱ्याच्या जाळ्यात अडकून,

ऐका रडतेय माझी भारत माता

चला उठू पेटून सारे आपण,

वेडे समर्पण करू,तिच्या मुक्तता आता.


Rate this content
Log in