STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Others

3  

Hareshkumar Khaire

Others

स्वाभिमान

स्वाभिमान

1 min
9.6K


*स्वाभिमान*


खऱ्याला खोटं ठरवूनी

खोटं खपवू नका

मती आपली गहाण ठेवूनी

स्वाभिमान विकू नका.


सत्याची सदा कास धरावी

द्या असत्याला धक्का

सत्यमेव जयते

हा निर्धार असावा पक्का.


जपून ठेवा प्रामाणिकता

माणुसकी हरवू नका

मती आपली गहाण ठेवूनी

स्वाभिमान विकू नका.


Rate this content
Log in