STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

सुवर्णाक्षर

सुवर्णाक्षर

1 min
362

मज शोधत गं आले माझे सद्गुरू राय

आत्मसाक्षात्काराने मज भेटली माझी माय

गुरू माझे दैवत, गुरू काशी क्षेत्र

सुवर्णाक्षराने लिहिलेले आहे गुरूचरित्र


गुरू दत्ताने चोविस गुरू हो केले

साऱ्या देवतांचे स्थान, गगनगिरीत दिसले

गेले होते, मैत्रिणीसह कार्ला देवीला

येता येता सहज पाय वळले खोपोलीला


निघताना घेतला फोटो बाबांचा मी असाच

नामस्मरण केले वेळ जाईना म्हणून

पहाटेच्या प्रहरी मंत्रपुष्पांजलीची धून

दिव्यत्वाची प्रचिती साक्षात्कार घडवून


काळजात सुवर्णाक्षराने कोरुन, गुरू तोच केला

गुरूभक्ती करण्याचा मार्ग त्यांनी दाखविला

पहाटे उठवून पारायण, नामस्मरण धडा शिकवला

सुगंधात परिमळ कधी फुलपाखरू होऊन भेटला


काय लीला त्यांची थोर, कानात मंत्र घोष,

चाले दिन रात्र, गुरू शिष्यांचे आत्म्यातून जयघोष

दोन पावलावर देव, नाही हाक मारण्यास वेळ

सुवर्णाक्षराने लिहावा असा होता सुवर्णकाळ...


Rate this content
Log in