सूर्यदेवा...
सूर्यदेवा...
1 min
502
सूर्यदेवाला एकदा
जागच नाही आली
पसरलीच नाही जमिनीवर
सुर्यकिरणांची लाली..
उमलली नाही फुले
फुलपाखरे बागडली नाही
घरट्यातच झोपून राहिले पक्षी
किलबिलाट झालाच नाही....
झोपून झोपून आळसावले
पृथ्वीवरील सर्व जीव
तेव्हा कुठे नंतर आली
सुर्यदेवालाच त्यांची कीव...
पसरता सुर्यकिरणे पृथ्वीवर
नवचैतन्य आले फुलून
नव उत्साह नवीन आनंद
घेऊन कामात गेले सर्व गुंगून.....
