Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

सुनसान रस्ता

सुनसान रस्ता

1 min
12.2K


याच रस्त्यावर चालून 

प्रगती केली मानवाने 

प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक 

यश मिळवले त्याने 


चालताना कधी 

मागे वळून पाहिलं नाही

झपाटलेल्या सारखं 

स्वतःकडे कधी बघितलं नाही 


चालतच राहिला 

रस्त्याची पर्वा न करता 

खूप आले संकट पण 

थांबलाच नाही न थकता 


रस्ता थकला होता आता -----

घ्यावी वाटली थोडी विश्रांती 

लॉकडाऊन झाले जाहीर  

मिळाली त्यांनाही मुक्ती पण -----


आता रस्ता वाट पाहतोय 

वाहनांची आणि वाटसरूची

त्याला असह्य झाले 

हे एकटेपण.


Rate this content
Log in