सुंदर
सुंदर
1 min
96
नर नारी मिरवीत
उत्तम वस्त्रे
अन् उत्तम सुंदर प्रसाधने
मिरवीत वावरती घेऊन अस्त्रे ।।1।।
दिसण्या सारे सुंदर
करती ते मनाने धडपड
आज ही पावडर
तर उदया आणखी काही परवड ।।2।।
कशाला घालवू या वेळ
हा सारा सौंदर्यासाठी वाया
सुंदर तनाने नाही
तर सारे मनाने होऊ या ।।3।।
