Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

angad darade

Others

3  

angad darade

Others

सुखी ठेव देवा

सुखी ठेव देवा

1 min
198


जगी देवा कर । सुखी सारे जन । 

हेची माझे मन । सांगेतुज ॥ 


गरिबांस मिळो । पोटभर अन्न । 

जगणं हे भिन्न । नको करू ॥ 


अनाथास देरे । मायेचे रे छत्र । 

सारे तुझे पुत्र । जगी या रे ॥ 


कोनी न करो । कोणासीच वैर । 

साऱ्याची तू खैर । कर देवा ॥ 


संकटात दे रे । सकळांसी धीर l। 

उध्वस्त रे सारं । करू नको ॥ 


ममतेने ठेव । सकळांसी सुखी । 

नको करू दुःखी । कधी कोणा ॥ 


अंगद हा मागे । देवा तुज पाशी । 

ठेव सकळांसी । सुखीसदा ॥ 


Rate this content
Log in